अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जावयाने सासूला मारहाण करीत एक तोळ्याचे गंठण चोरल्याची घटना सावेडीतील पवननगरमध्ये घडली. याप्रकरणी सासू सविता शतानंद सातपुते (रा. पवननगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावाई दादा आसाराम घोडके (वय- ३० रा. पारोडी ता. आष्टी जि. बीड) याच्यासह इतर ६ अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता सातपुते यांची मुलगी मिनाश्री हिचा विवाह दादा घोडके याच्या सोबत झाला आहे. त्यांना एक लहान मुलगा आहे. लहान मुलासह मिनाश्री या पवननगरमधील माहेरी आई सविता यांच्याकडे राहतात.
गुरूवारी दुपारी दादा घोडके हा त्याच्या सोबत इतर ६ जणांना घेऊन पवननगरमध्ये आला. त्याने सासू सविता यांना मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण तोडले.
माझा मुलगा मला परत द्या. नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत दादा याने मुलगा पृथ्वीराज याला सोबत घेतले.
घर बाहेरून बंद करून मुलासह दादा घोडके निघून गेला असल्याचे सविता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे करीत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved