Shirdi News : शिर्डी शहरात परराज्यातील महिला साईभक्ताचे सव्वातीन लाख रुपये किंमतीचे दागिने धूम स्टाईलने लांबविण्यात आल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,
की साईबाबांच्या दर्शनासाठी आर. साई सत्या (वय ५९) या तामीळनाडू राज्यातील कोईमतूर येथून आपल्या कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन आलेल्या होत्या.
१७ ऑगस्ट रोजी साईबाबांची पहाटे ४ वाजताची काकड आरती करुन परत द्वारावती भक्त निवासाकडे रिक्षातून उतरून जात असताना सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास हॉटेल बन्सीजवळ दोन जण काळ्या रंगाच्या विनानंबर दुचाकीवर असलेले तरुण त्यांच्या अंगावर दुचाकी घेऊन आले.
त्या बाजूला झाल्या, यावेळी मागे रुमाल बांधून बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील १० तोळे वजनाची सोन्याची चेन व दिड तोळ्याचे गळ्यातील मंगळसूत्र असा जवळपास ३ लाख २५ हजाराचा ऐवज चोरुन नेला तशी फिर्याद या महिलेने शिर्डी पोलिसात दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली असून या चोरटे चांगलेच धष्टपुष्ट आहेत. या चोरांच्या विरोधात व त्यांच्याकडून सोने विकत घेत असलेल्या सराफांच्या विरोधात कडक भुमिका पोलिसांनी घेतली तर सहजपणे या घटना कमी होतील.
शिर्डी शहरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत; मात्र ते अजुन चालु झालेले नसल्याने हे चोरटे अशा पद्धतीने फायदा घेत आहेत.