अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. पूर्वीप्रमाणे बाधितांची संख्या वाढत नसली तरी देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येतच आहे.
कोरोनामुळे गेली अनेक महिने बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा यातच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील माध्यमिकच्या जवळपास 1200 शाळा असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू आहेत.
एकूण 16 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 11 हजार शिक्षकांची चाचणी झाली आहे. त्यात आतापर्यंत 79 जणांचे अहवाल बाधित आले असून, अजून अनेक कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी आहेत.
जिल्ह्यात 378 शाळांमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीद्वारे अध्यापन सुरू आहे. उर्वरित शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जात आहेत.
सध्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. शासनाच्या सूचनांनुसार शाळा सुरू झाल्या असून, माध्यमिक शिक्षण विभागाकडून रोज शाळांचा आढावा घेतला जात आहे.
किती शिक्षकांच्या तपासण्या झाल्या आहेत याची माहिती घेतली जात आहे. जिल्ह्यातील 1200 शाळा आहेत. शासनआदेशानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात 1 लाख 84 हजार विद्यार्थी आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved