अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करू लागले आहे.
तसेच विकासाचा अजेंडा घेत सत्तेची समीकरणे देखील जुळवू लागली आहे. नुकतेच शिवसेना – भाजपात शाब्दिक टीकेची झोड उठली आहे.
येणार्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत दोन्ही खासदार, आमदार हे महाआघाडीचेच असणार आहेत. तेव्हा कोणीही आमदारकीचे स्वप्न चुकूनही पाहू नये.
गेलेले दिवस पुन्हा येणार नाहीत, असा टोला जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांनी माजी आ. शिवाजी कर्डीले यांचे नाव न घेता लावला.
मदडगाव येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीच्या प्रचारात गाडे बोलत होते. यावेळी गाडे म्हणाले, राज्यात महाआघाडी सरकार जिल्ह्यातील आघाडीचे तिनही मंत्री जनतेच्या प्रश्नासाठी दिवस रात्र झटत आहेत.
महाआघाडीचे सदस्य जिल्हा परिषदमध्ये विकास कामाचा पाठपुरावा करण्यासाठी पूर्ण वेळ देतात. तसेच तालुका दुध संघाची कोट्यावधीची मालमत्ता विकली याची चौकशी केली पाहिजे.
दादा पाटील यांनी मोठ्या ताकदीने कारखाना उभा केला. या कारखान्यांला कर्ज पुरवठा केला नाही, म्हणून कारखाना विकायला काढण्याची वेळ नगरच्या संचालकामुळे आली असून याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.