Ahmednagar News:बाजार समिती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निश्चित विजय मिळणार आहे. पण ज्यांना आम्ही सन्मान दिला, सदैव गाडीत बसवले तेच पक्ष सोडून गेले व आता ते डी झोन’च्या बाहेर आहेत.
गेली अडीच वर्षे कर्जत-जामखेडमध्ये इंग्रजांचे राज्य होते की मोगल शाही होती. कारण या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखे वागवले. अशी टीका आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केली. अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना आ. राम शिंदे बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, त्यांच्या आदेशाने अनेकांनी आपला अधिकार बाजूला ठेवला म्हणून दोन अधिकाऱ्याच्या विकेट घेतल्या. जनतेच्या हितासाठी अधिकाऱ्यांनी काम करायला पाहिजे. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणी पातळी वाढली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात पाण्याचा एकही टँकर लागला नाही.
मी शेतकरीविरोधी आहे, अशी चर्चा घडवली जाते परंतु मी शेतकरी विरोधी नाही. सद्या भाजपचे निवडून आलेले सदस्य सरपंचाना बोलावून त्यांना सत्कार करावा लागत आहे. मतदार संघात खोटं बोलण्याचा बोलबाला असून गेली तीन वर्षे कुकडीचे पाणी आलेच नाही. मग खरा शेतकरी विरोधक कोण?
असा प्रश्न उपस्थित करत तुम्ही लायसन्सची दुकाने बंद करता ते जमते. मग मी विनापरवाना सुरू केलेला कारखाना कसा सुरू होऊ देऊ? असे म्हणत मतदार संघातील बुथप्रमुख खरा आहे, सध्या माझ्या वाढदिवसाला येवढे शुभेच्छाचे फलक लागलेच कसे असा प्रश्न विरोधकांना पडला असून,
मागील पराभव झाला असला तरी पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ द्यायचे असून सर्व निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याची माझी जबाबदारी वाढली आहे असे सांगत कार्यकर्ता महत्वाचे असल्याचे संकेत दिले.