कर्जत नगरपंचायत निवडणूक ! चार जागांसाठी इतके उमेदवार रिंगणात

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच कर्जत नगरपंचायतच्या चार प्रभागासाठी एकूण 28 उमेदवारी अर्ज भरण्यात आली होती छाननीमध्ये यातील तीन अर्ज बाद झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानंतर 18 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चार जागांसाठी आता 10 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये दोन प्रभागांमध्ये दुरंगी तर दोन प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

यामध्ये भाजपचे चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीन वंचित बहुजन आघाडी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरला आहे.

Advertisement

प्रभाग निहाय उमेदवार खालील प्रमाणे – प्रभाग 1 : ज्योती दादासाहेब शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस), वंदना भाऊसाहेब वाघमारे (भाजप), प्रभाग 3 : संतोष सोपान मेहेत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस), रावसाहेब पंढरीनाथ खराडे (भाजप),

शांता मुकिंदा समुद्र (वंचित आघाडी), प्रभाग 5 : रोहिणी सचिन घुले (काँग्रेस), सारिका गणेश शिरसागर (भाजप). प्रभाग 7 : सतीश उद्धवराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस),

दादा साहेब अर्जुन सोनमाळी (भाजप), शिवानंद लक्ष्मण पोटरे (वंचित आघाडी) यापूर्वी 13 प्रभागांच्या निवडणुका झाल्या आहेत. कर्जत शहरांमध्ये पुन्हा एकदा या चार प्रभागाच्या निमित्ताने निवडणुकीचे राजकारण आरोप-प्रत्यारोप याची रान उठणार आहे

Advertisement