अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना नागरिकांकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचा बेजबाबदारपणा कोरोनावाढीस कारणीभूत ठरत आहे.
नुकतेच कर्जत तालुक्यातील राशीन शहरामध्ये पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्वतः व पोलीस कर्मचारी मिळून कर्जत शहारा मध्ये विना मास्क फिरणारे व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्यांवर नागरिकांवर ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली.
तसेच लोकांना मास्कचा वापर करा, सोशल डिस्टंसिंग पालन करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
सर्वांनी कोरोना विषाणू च्या अनुषंगाने मास्क चा वापर करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे याबाबत सूचना दिल्या. विना मास्क तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या ३७ लोकांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.