कौसर खान यांची महिला शहर सेवादल काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- नगर शहर महिला सेवादल काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी कौसर मेहमूद खान यांची निवड करण्यात आली आहे.

सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे यांनी खान यांना निवडीचे पत्र दिले आहे. आ. डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मान्यतेने खान यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

खान या मागील दहा वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत. खान यांनी आजवर महिला आरोग्य तपासणी शिबिरे, महिला बचत गट, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आदी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना खान म्हणाल्या की, नगर शहरामध्ये महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे,

ज्येष्ठ नेते निजामभाई जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली सेवादल काँग्रेसच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी मी काम करणार आहे. खान यांच्या निवडीबद्दल ना. बाळासाहेब थोरात,

आ.सुधीर तांबे, सत्यजित तांबे, किरण काळे, दीप चव्हाण, निजामभाई जागीरदार, अज्जूभाई शेख, नाथा अल्हाट, डॉ.मनोज लोंढे, नलिनीताई गायकवाड,

सुनिता बागडे, उषाताई भगत, नीता बर्वे, चिरंजीव गाढवे, अनंतराव गारदे, खलील सय्यद, डॉ. रिजवान शेख, अनिसभाई चुडीवाल आदींनी अभिनंदन केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24