केदारेश्वर साखर कारखान्याचे ४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : गेल्या चार वर्षांपासून संघर्षयोद्धा स्व. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना ही संस्था हळूहळू उर्जितावस्थेत येत असून, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याने चार लाखांच्या पुढे गाळप केले असून, यावर्षीदेखील चार लाख टन उसाचे गाळप करण्याचा मानस आहे.

लोकनेते संघर्षयोद्धा स्व. बबनराव ढाकणे यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून या भागातील सर्वसामान्य माणसांना संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी आमची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन संघर्षयोद्धा स्व. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा स्व. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ / २४ च्या चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या अकरा साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक अॅड. प्रतापराव ढाकणे तसेच कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी, दि. ९ रोजी बोधेगावसह परिसरातील साधूसंत व महंतांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले.

या वेळी आयोजित कार्यक्रमात काटे बोलत होते. यामध्ये श्री. काशी केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती बाबागिरी महाराज, भक्तराज महाराज संस्थान तोंडोळीचे मठाधिपती झुंबड महाराज, रामनाथशास्त्री महाराज, ज्ञानेश्वर महाराज बटुळे,

गणेश महाराज डोंगरे, विकास महाराज झिरपे, नंदकिशोर महाराज चव्हाण, ईलग महाराज शास्त्री, धर्मराज महाराज फुंदे, सुदर्शन महाराज बोडखे, लक्ष्मण महाराज भवार आदी महाराजांच्या प्रमुख पोत्यांचे पूजन करण्यात आले.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, चीफ केमिस्ट पुंडलिक सांगळे, चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, चीफ इंजिनियर प्रवीण काळूसे, लीगल ऑफिसर शरद सोनवणे, सर्वश्रीः संचालक बाळासाहेब फुंदे, भाऊसाहेब मुंडे,

शिवाजी जाधव, त्रिंबक चिमटे, सदाशिव दराडे, संदीप बोडखे, पांडुरंग काकडे, बापूराव घोडके, केनियार्ड सुपरवाईजर किसन पोपळे, तुकाराम वारे ऊस विकास अधिकारी सचिन राऊत, अंबादास दहिफळे, सुधाकर खोले यांच्यासह शेतकरी, ऊसउत्पादक, हितचिंतक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.