अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- सावेडी उपनगरातील कचरा डेपो परिसरात असलेल्या शेतातील लोखंडी गज व इतर साहित्य चोरुन नेणार्या दोघा चोरट्यांना अटकाव केल्याचा राग आल्याने त्यांनी एका जणास दगडांनी तसेच धारदार शस्त्राने मारहाण केली.
यात अविनाश तुकाराम वारुळे ( रा.कल्पतरू सोसायटी, ममता गॅस एजन्सीच्या जवळ, गुलमोहोर रोड) हे जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी वारुळे यांची सावेडी कचरा डेपोच्या परिसरात पोखर्डी शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतावर काम करणार्या कामगाराने त्यांना फोन करुन कळविले की, गणेश बर्डे,
सोनू बर्डे (रा.सावेडी कचरा डेपो परिसर) हे दोघेजण शेतातील लोखंडी गज व इतर साहित्य बळजबरीने चोरुन नेत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी वारुळे हे त्या ठिकाणी गेले असता
आरोपी बर्डे यांनी त्यांच्यावर दगडाने हल्ला केला तसेच धारदार शस्त्राने त्यांना मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी दवाखान्यात उपचार घेऊन नंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गणेश बर्डे व सोनू बर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.