Ahmednagar News : केएफसी रेस्टॉरंटची फ्रंचाईजी देतो, असे सांगून सायबर चोरट्यांनी नगर शहरातील एका डॉक्टर महिलेची ५ लाख ८० हजार ५०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी बुधवारी येथील सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सावेडी उपनगरात राहणाऱ्या डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे. ३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलवर तीन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून सायबर चोरट्यांनी वेळोवेळी संपर्क केला.
केएफसी रेस्टॉरंटची फ्रांचाइजी देतो, म्हणून विश्वास संपादन केला. त्यासाठी ऑनलाईन व्हेरिफिकेशन झाले आहे. आता तुम्हाला एनओसी क्लिअर झाल्यावर तुमचे लोकेशन फायनल होईल, अशा वेगवेगळ्या बतावण्या करून फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन पैसे बँक खात्यात भरून घेतले.