अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे हे भाजपात असताना त्यांना जी किंमत पक्षात मिळाली ती राष्ट्रवादीत मिळणारं नाही.’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (बुधवार) भाजपचा राजीनामा दिला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणारं असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याची बातमी समजताच भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्यांनी बोलताना सांगितलं की, ‘एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात असताना त्यांना जी किंमत मिळाली ती त्यांना राष्ट्रवादीत मिळणारं नाही.
तसेच त्यांच्याबरोबर जे जात आहे अशी जी वल्गना केली जात आहे ती चुकीची असून मला वाटतं नाही की भाजपचा कोणताही माणूस राष्ट्रवादीत जातील.
कारणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा विस्तार होतं आहे.’ असं राम शिंदे म्हणाले. ‘एकनाथ खडसे यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचा देखील येत्या त्यांना नक्की पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.’ असेही ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved