अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा धाक चोरट्यांच्या मनात राहिला नसल्याने शहरासह जिल्ह्यात खुलेआम दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांच्या मनात दहशत माजविणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्याचा धडाका पोलीस प्रशासनाने लावला आहे. नुकतेच जबरी चोरी करणारा व दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने पकडले.
विशाल उर्फ गणेश बाळासाहेब शेटे (रा. डावखर खळेवाडी ता. राहुरी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी गणेश शेटे याच्यावर राहुरी, लोणी, राहाता, श्रीरामपूर शहर, यरोवडा, चंदननगर या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल खटके यांच्या सूचनेनुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख,
पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, दीपक शिंदे रवी सोनटक्के, पोकाॅ रणजित जाधव, लक्ष्मण खोकले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.