अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून तब्बल पाच अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा गंभीर प्रकार गत तीन दिवसांमध्ये घडला आहे. या प्रकाराने पालक वर्गात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसात याबाबत वेगवेगळे गुन्हे दाखरल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर येथोल पद्मावती गली भागात राहणारी मुलगी दि.१३जानेवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कॉलेजला गेली असता अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेले आहे.
याबाबत मुलीच्या आईने पारनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.तर दुसऱ्या घटनेत संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द परिसरात राहणाऱ्या
एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला भरदिवसा २ च्या सुमारास अज्ञात कारणासाठी कोणीतरी पळवुन नेले. मुलीच्या आईने या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात फिर्याद दिली.
त्यावरून आरोपी सोमवंशी, रा.ढोलेगाव, ता. संगमनेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आला आहे. तर तिसऱ्या घटनेत लोणी बु.परिसरातील एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीली मकरसंक्रातीच्या दिवशी सकाळी ९ च्या सुमारास अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी कायदेशीर रखवालातून पळवून नेले. याबाबत मुलीच्या आईने लोणी पोलिसात फिर्याद दिली आहे.
तर चौथ्या घटनेत श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव परिसरातील १७ व १४ वर्षाच्या या दोन अल्पवयीन मुलींना संक्रांतीच्या दिवशी दुपारी ४ च्या सुमारास या दोघी मैत्रिणींना अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी फूस लावून कशाचेतरी आमिष दाखवून पळवून नेले आहे.
याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिसात तक्रार दिली आहे. गेल्या दोन दिवसात ५ अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचा प्रकार घडला. या घटनेने पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.