अल्पवयीन मुलीचे अपहरण, मुलीच्या आईची पोलिसात फिर्याद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथून एका अल्पवयीन मुलीचे रविवार दि.१४ जून रोजी मध्यरात्री तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची तक्रार खुद्द तिच्या आईने पाथर्डी पोलिसात दाखल केली आहे.

तरी पोटच्या मुलीस पळवून नेणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संबंधित मुलीच्या आईने फिर्यादीद्वारे पोलिसांकडे केली आहे.

याबाबत सविस्तर असे की, पतीच्या निधनानंतर संबंधित फिर्यादी महिला तिसगावात स्वत:च्या घरात एक मुलगा, एक मुलगी असे तिघेजण राहतात.

शेजारच्या एका महिलेच्या नातवाने जो पुणे येथे राहत आहे. त्यानेच काही दिवसापूर्वी आमच्याकडे आमच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली होती. मात्र आम्ही त्यास स्पष्ट नकार देत पाथर्डी पोलिसांकडे त्यासंबंधी तक्रार केली होती.

त्यानंतर रविवार दि.१४जून रोजी मध्यरात्री मी माझ्या मुलगा व मुलीसह घरात झोपलेलो होतो, मध्यरात्रीच्या सुमारास मला जाग आली तेव्हा माझी मुलगी आमच्या जवळ घरात झोपलेली दिसुन न आल्याने मी आरडाओरड करून शेजारच्या लोकांना मदतीसाठी बोलावले.

आजूबाजूला मुलीचा शोध घेतला परंतु मुलीचा कुठेच शोध लागला नाही. माझ्या मुलीस करण सर्जेराव साबळे या तरुणाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत, त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिसात मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास घरातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना तिसगाव सारख्या मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या शहरात घडल्यामुळे तिसगाव मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे हे करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24