अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- राहाता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूरच्या ९० यर्षीय कोरोनाब्राधित वृद्धाचा मंगळवारी (दि. १४) एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
कोल्हार-भगवतीपूर-लोणी रस्त्यावर भगवतीपूर येथील एका वस्तीवरील कोरोना बाधितांची संख्या १५ झाली आहे. यात एका ९० वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची बाधी झाली होती.
मात्र या व्यक्तीच्या निधनाने परिसरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोल्हार-भगवती यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.
दरम्यान, कोरोनाबाधित व्यक्तीच्या निधनामुळे या परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने हा परिसर सील केला असून येथील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com