त्या महिला डॉक्टरमुळे कोपरगावकरांचा जीव टांगणीला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगाव येथील एका कोरोनाबाधित महिला डॉक्टरच्या संपर्कातील पाच व्यक्तींचे स्त्राव शुक्रवारी नगर येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्या पाचही जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तर शनिवारी आणखी ९७ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. राहाता तालुक्‍यातील लोणी येथील कोरोनाबाधित व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्या कोपरगावच्या महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटीव आला होता.

त्यामुळे प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत या महिलेच्या संपर्कातील २२ जणाचा शोध घेऊन त्यांचे श्राव तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी ५ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अजून १७ व्यक्‍तींचे अहवाल येणे बाकी असल्याने कोपरगावकरांचा जीव टांगणीला लागला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24