गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांकडून अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे जवळ घेऊन फिरणार्‍या एका तरूणाला अटक केली आहे. भुषण रजणीकांत निकम (वय 40 रा. एमआयडीसी, नगर) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.

कोतवाली पोलिसांनी रात्री साडेअकरा वाजता केडगाव उपनगरात ही कारवाई केली. निकम विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी निकम कडून पोलिसांनी एक दुचाकी, गावठी कट्टा, दोन काडतुसे असा 45 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, केडगावमध्ये एक तरूण दुचाकीवर गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची गोपनीय माहिती कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

पोलीस पथक तातडीने संबंधित ठिकाणाकडे रवाना झाले. पथकाने केडगावातील कारमेल शाळेजवळ निकम याला पकडून त्याची झडती घेतली असता गावठी कट्टा,

काडतूसे मिळून आली. पोलिसांनी मुद्देमालासह त्याला ताब्यात घेत अटक केेली. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!