कोतवालीचे पोलिस निरीक्षक मानगावकर यांचा सन्मान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्टपणे कर्तव्य बजावणारे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचा चर्मकार विकास संघ व लोकनेते

सीताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलिस स्टेशन येथे मानगावकर यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा. सुभाष चिंधे, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष नवनाथ बोरुडे, युुवा उपाध्यक्ष विकी कबाडे, रविदासीया प्रीतम देसाई आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात कोपरगाव येथे कार्यरत असताना पो. नि. मानगावकर यांनी उत्तमपणे कर्तव्य बजावून अनेक गरजूंना मदत केली.

याची दखल घेत त्यांना कोरोनायोध्दा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी सांगितले. मानगावकरांनी हा सन्मान पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा असल्याची भावना व्यक्त केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24