Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ असून या ठिकाणी विद्यमान आमदार मोनिका राजळे या निवडणुकीच्या रिंगणात असून त्या तिसऱ्यांदा या मतदारसंघांमधून नशीब आजमावत असून ते हॅट्रिक साधणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
जर आपण या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती बघितली तर या निवडणुकीमध्ये मोनिका राजळे हे एका बाजूने तर सर्व विरोधक एकत्र येऊन एकवटले असून मोनिका राजळे या आता मोठ्यात धैर्याने एकाएकी या सगळ्या गोष्टींना लढा देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
परंतु कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोनिका राजळे यांच्यासोबत आहेतच परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे सुपुत्र चि. कृष्णा राजळे हे देखील एखाद्या पर्वताप्रमाणे आपल्या आईच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याचे चित्र असून त्यांनी अनेक तरुणांना एकत्र करत तरुणांची मोट बांधली आहे व तरुणांची एक फौजच आईच्या मागे उभी केल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज वडिलांची जागा काही प्रमाणात का होईना या लहान वयामध्ये कृष्णा राजळे भरून काढताना दिसून येत आहे. आई सोबत अनेक ठिकाणी प्रचार फेऱ्यांमध्ये ते उपस्थिती लावत असून कृष्णाला पाहून अनेकांचे डोळे देखील पानावल्याचे चित्र सध्या या मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले. इतकेच नाही तर अनेक मतदारसंघांमध्ये कृष्णा याला काही महिलांनी जवळ घेत कुरवाळून रडतानाचे चित्र देखील आपण पाहिले असेल.
चि. कृष्णा राजळे भक्कमपणे उभे राहिले आई मोनिका राजळे यांच्या पाठीशी
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार मोनिका राजळे या निवडणुकीच्या रिंगणात असून या ठिकाणी सगळे विरोधक एकीकडे तर एकट्या मोनिका राजळे एकीकडे असे चित्र असताना मात्र मोनिका राजळे यांच्या पाठीशी त्यांचे सुपुत्र कृष्णा राजळे हे उतरले असून मतदारसंघांमध्ये तरुणांना एकत्र करत तरुणांची फौजच आईच्या मागे त्यांनी उभी केल्याचे चित्र दिसून येत आहे.
तसेच मोनिका राजळे यांच्यासोबत कृष्णा हे देखील अनेक ठिकाणी प्रचार फेऱ्यामध्ये सहभागी होत असून त्यांचे वडील स्व. राजीव राजळे यांच्या रूपाने कृष्णाला पाहताना अनेकांचे डोळे देखील भरून येत असून अनेक ठिकाणी महिला त्यांना कुरवाळून ढसाढसा रडतानाचे चित्र देखील पाहायला मिळत आहे.
जेव्हा कृष्णा यांच्याकडे व त्यांच्या वयाकडे जेव्हा जुने कार्यकर्ते पाहता तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येते व स्व. राजीव राजळे यांचे अचानकपणे जाण्याने राजळे कुटुंबीयांची यांच्या रूपाने या घराची भिंत खचली, चूल देखील विझली होती व होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले अशी परिस्थिती झालेली होती. परंतु आता अशा बिकट परिस्थितीत देखील आई मोनिकाला घेऊन ये संगे आता कृष्णा पुन्हा लढत असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे.
या खडतर परिस्थितीत देखील भक्कमपणे आईच्या पाठीशी उभे राहून एक प्रकारे कृष्णाच सगळ्या गोष्टींची लढत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कृष्णाला मतदारसंघातील गावागावातील तरुणांचा पाठिंबा मिळत असून तरुणांमध्ये त्याचे फार मोठे आकर्षण सध्या निर्माण झाल्याचे चित्र आहे. येणाऱ्या कालावधीत कृष्णा राजळे हा तरुणाईतील एक जॉईंट किलर ठरेल असे या मतदारसंघात सध्या बोलले जात आहे.
अगदी वडिलांप्रमाणेच असलेली अभ्यासूवृत्ती तसेच शांत स्वभाव व समोरच्या कुठल्याही विषयावर बोलत असताना समोरचा काय बोलत आहे हे शांतपणे ऐकून घेण्याची त्याची लकब ही समोरच्या लोकांना कृष्णाच्या मोहात पाडणारी आहे.
शेवटी जर मोनिका राजळे यांनी या निवडणुकीत विजयाची हॅट्रिक साधली तर या विजयामागे नक्कीच कृष्णा राजळे यांचा मोलाचा सहभाग असणार आहे हे मात्र निश्चित. इतकेच नाहीतर कृष्णा राजळे व त्यांच्या सगळ्या तरुणांची फौज यांचा एक इतिहास मोनिका राजळे यांची हॅट्रिक साधल्यावर नक्कीच लिहिला जाईल अशी सध्या परिस्थिती आहे.