अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील कुकडी सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार दिवाळीपूर्वी २९११ प्रमाणे उर्वरित पेमेंट; चेअरमन राहुल जगताप यांची ग्वाही

Published by
Ajay Patil

Ahmednagar News: कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात कुकडी कारखाना कार्यस्थळावर नुकतीच पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी या कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप हे होते व यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील जे काही उसाचे पेमेंट राहिलेले आहे ते 2911 रुपया प्रमाणे दिवाळीच्या आधीच देण्याची ग्वाही देखील माजी आमदार व कुकडी कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी आधी हे उर्वरित पेमेंट मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 कुकडी सहकारी साखर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राहिलेले उसाचे पेमेंट दिवाळीपूर्वी देणार

विरोधी पक्षात असल्याने कारखान्यात अनेक अडचणी आणल्या, पण मार्ग काढत कुणाचे पेमेंट राहणार नाही. अडचणींतही सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी सहकार्य केले असून, मागील राहिलेले उसाच पेमेंट २९११ प्रमाणे दिवाळीपूर्वी देण्याची ग्वाही माजी आमदार व कुकडी कारखाना चेअरमन राहुल जगताप यांनी दिली.कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा कुकडी कारखाना कार्यस्थळावर पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.पुढे बोलताना जगताप यांनी मागील हंगामातील ऊसाचे पेमेंट २३०० रुपयांनी देत आहोत. सगळे पेमेंट दिवाळीच्या पूर्वी २९११ रुपये देणार आहे.

कामगाराचे राहिलेले पगार देणार आहे. काही राजकीय विरोधकांनी कारखाना चालू होणार नाही, असं विष पेरले. त्यांनीच अडचणी उभ्या केल्या, पण कारखाना मोठया जोमाने चालू करून गाळप करणार.

अडचणीवर मार्ग काढून सर्वांचे पेमेंट त्यांच्या खात्यावर जमा होईल. बीओटी तत्वावर डिस्लरी सुरू करण्याचा विचार होऊ करू. एफआरफी कमी असताना जास्त बाजारभाव दिला, त्यामुळे तोटा वाढला, त्यामुळे सर्व साखर कारखाने एनसीडीसीकडे कर्ज मागत आहेत. मी विरोधात असल्याने एनसीडीसीने कर्ज नाकारले. कोर्टात गेलो, त्यामुळे कुकडीला कर्ज द्यावे लागणार आहे.

या वेळी घनश्याम शेलार यांनी बोलताना कारखाना उभा करताना तात्यांनी आणि आम्ही संघर्ष केला. कर्ज घेऊन कारखान्यांचे शेअर्स घेतले आहेत. कारखाना हा शेतकऱ्यांची व ऊस उत्पादक व सभासदांची कामधेनू असल्याने कारखाना टिकला पाहिजे, यासाठी कारखाना प्रशासनाने व संचालक मंडळांनी वेळ देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्रह बदल पाहिजे.

या वेळी बाजार समितीच अध्यक्ष अतुल लोखंडे, दिनक पंदरकर, तानाजी बोरुडे, नारायण झेंडे, दादा लगड, विजय गावड दादा जाधव यांनी सभासदांचे प्रश्न मांडले. सभेस संचालक जालिंद निंभोरे, संभाजी राजे दिवेकर बाळासाहेब उगले, मेजर निंभोरे यांच्यासह कार्यकर्ते व ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते प्रास्ताविक उपाध्यक्ष विवेक पवा यांनी केले.

Ajay Patil