Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये लढत होत असून दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे.
यामध्ये विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मोठ्या प्रमाणावर गाव भेटी तसेच मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला असून या अनुषंगाने त्यांनी सोनगाव तसेच धानोरे, अनापवाडी इत्यादी ठिकाणी प्रचार दौरा आयोजित केलेला होता व यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की विकास कामांच्या बाता मारणाऱ्या शिवाजी कर्डिले यांनी दहा वर्षात विकास कोठे केला? हे राहुरीच्या नागरिकांना चांगलेच ठाऊक असल्याचे त्यांनी म्हटले.
कर्डिलेंनी समोर यावे मी त्यांना विकास कामे दाखवतो- आमदार प्राजक्त तनपुरेंचे आव्हान
विद्यमान आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान राहुरी परिसरातील सोनगाव तसेच धानोरे, डुकरेवाडी आणि अनापवाडी येथे प्रचार दौरा आयोजित केलेला होता व त्यावेळी त्यांनी शिवाजी कर्डिले यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की विकास कामांच्या बाता मारणाऱ्या शिवाजी कर्डिले यांनी दहा वर्षात विकास कोठे केला? हे राहुरीकरांना चांगलेच ठाऊक आहे. कर्डिलेंची विकासाची व्याख्या वेगळी असून माझ्या आमदारकीचा विकास त्यांना दिसणार नाही.
पोकळ गप्पा मारण्यापेक्षा कर्डिलेंनी समोरासमोर यावे. राहुरी मतदार संघात झालेली विकास कामे मी त्यांना दाखवून देतो असे थेट आव्हान आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले.
याप्रसंगी किरण कडू तसेच विकास पडघडमल, विजय पडघडमल, कैलास पडघडमल तसेच दत्तात्रय सिनारे, आसिफ इनामदार, शिवाजी अनाप, अण्णा साहेब अनाप तसेच दानिश तांबोळी इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
काय म्हणाले यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे?
यावेळी पुढे बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले की, निळवंडे धरणाचे पाणी आणले तरच मी तुमच्यासमोर येईल. नाहीतर मला चपलाने मारा असे आश्वासन शिवाजी कर्डिले यांनी 2014 च्या निवडणुकीत दिले होते. परंतु त्यांनी निळवंडे चे पाणी आणले नाही. परंतु मत मागायला आल्यानंतर त्यांना जागा दाखवून दिलेली आहे.
निळवंडे कालव्यासाठी महाविकास आघाडी शासन काळामध्ये 1250 कोटी रुपये आणले. मतदार संघात 400 पेक्षा अधिक नवीन रोहित्र देताना दहा उपकेंद्र निर्मिती देखील केली. सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्धतेला प्राधान्य दिले. तसेच मुळाच्या ओव्हर फ्लो पाण्यातून वांबोरी व भागडा चारीला पाणी दिले.
बस स्थानक तसेच ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्नही मार्गे लागला असून त्याचे काम लवकरच सुरू होईल असे देखील त्यांनी म्हटले. केवळ पाच वर्षातच विकास कामे काय असते ते दाखवून दिले आहे. दहा वर्षाचा कामाचा हिशोब देत कर्डिलेंनी माझ्या कामाची तुलना करावी असा टोला देखील त्यांनी लगावला.