अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झालेल्या नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची सुविधा सुरु करण्याचे आदेश आल्यानंतर अनेक शाळांमधून ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली.
इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाहीत. काहींकडे अॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण द्यावे असे शासनाने सुचविले आहे परंतु याचा फक्त शहरी भागातीलच विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी यापासून वंचित राहिल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सध्या परिसरातून शाळेत जाणारे विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत.
शेतीची कामे व जनावरं-ढोरांची निगा राखण्यात शेतकर्यांचा वेळ जात असल्याने त्यांनी मुलांना अॅण्ड्रॉईड मोबाईल घेऊन दिले खरे! परंतु मुले ऑनलाईन अभ्यास करण्याऐवजी त्यावर गेमच जास्त वेळ खेळत बसतात.
जे गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्या कुटुंबाची असा महागडा मोबाईल घ्यायची ऐपत नाही. ते तर या शिक्षण पध्दतीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत.
त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा ग्रामीण भागात बट्ट्याबोळ झाला असून आजही अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com