शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील तलाव व बंधारे भरून द्यावेत : माजी आ. घुले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या वर्षी पाऊस अतिअल्प झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पिकाची दैनीय अवस्था झाली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्भभव कोरडे पडल्यामुळे नागरीकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसून जनावरांचा चारा देखील सुकु लागला आहे.

सध्या मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू उन्हाळी आवर्तनातून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकऱ्यांना उभ्या पिकासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पूर्ण दाबाने पाणी द्यावे व पाणी राखीव न ठेवता पूर्ण क्षमतेने सिंचन करून पिण्यासाठी तलाव, बंधारे भरून द्यावेत.

जेणेकरून शासनाचा टँकरचा खर्च वाचेल यासह या विविध मागण्यांसाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव व पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन दिले.

यावेळी आमदार चंद्रशेखर घुले समवेत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राजेंद्र देशमुख, अंबादास कळमकर, सुधाकर लांडे, शहादेव खोसे, अशोक मेरड, विक्रम लोढे, राजेंद्र आढाव, रोहन साबळे, माणिकराव बुधवंत,

उदय बुधवंत, जय बुधवंत, राहूल बेडके, बबन जाधव, अनंत सावंत, जगन्नाथ साबळे, गणेश खंबरे, अजय साबळे, लक्ष्मण नांगरे, चंद्रकांत निकम, गंगाधर भोसले, तुकाराम मुळे, संजय मराठे, लक्ष्मण नगरे आदी उपस्थित होते.

सन २०२३- २४ मध्ये अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असून परिसरातील विहिरी, कुंपणलिका यांना पाणी राहिले नाही. शेतकऱ्यांची पिके सर्वस्वी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

या सर्व संस्थांना पूर्ण दाबाने व मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात यावा जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्यांचे पीक पाण्यापासून वंचित राहणार नाही. लाभक्षेत्रातील नैसर्गिक प्रवाहवर छोटे-मोठे बंधारे व पाणी पुरवठे आहेत

या सर्व बंधाऱ्यात व पाणीपुरवठ्याचे ठिकाणी कालव्याचे पाणी देण्यात यावे जेणेकरून पिण्याच्या पाण्याची व पशुधनाच्या पिण्याचे पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe