अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- गेल्या तीन वर्षांपासून गुंडेगावच्या भागात पाऊस कमी पडत होता,यामुळे चार महिने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.
मात्र नगर तालुक्यातील गुंडेगावला गेल्या तीन चार दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे परिसरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. दर वर्षी तलाव हे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरत होते,
परंतु यंदा तब्बल महिनाभर अगोदरच ते सप्टेंबर सुरवातीला व मध्यात पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच गावकऱ्यांची पाणी टंचाई देखील मिटणार आहे.
यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या वर्षी गुंडेगावच्या सर्व भागात पाऊस चांगला झाल्याने कुताळमळा,हराळमळा,धावडेवाडी,गोठण तलाव, कोतकर मळा,गावठाण तलाव, ३२ बंधारे, तीन वन तलाव, २२ वन माती बंधारे, ओव्हरफ्लो झाले आहे, भुजल पातळीत वाढ झाली आहे,
तीन वर्ष पाऊस कमी पडल्याने दुष्काळाशी सामना करावा लागला असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती, आज शेतकरी वर्गातून सध्या आनंदाचे वातावरण आहे.पुढील एक ते दीड वर्षासाठी ची पाण्याची समस्या सुटणार आहे,