कल्याणच्या व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेकडील काही तालुक्यांत विविध फळांचे उत्पादन घेतले जाते. यात टरबूज, द्राक्षे आदी पिकांचा समावेश आहे.

राज्यभरातील व्यापारी या शेतकऱ्यांकडून माल विकत घेत असतात. परंतु यंदा कर्जत तालुक्यातील काही द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना काही कल्याण येथील व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

या फसवणुकीबाबत कर्जत पोलीस ठाण्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी निलेश दादा सायकर यांनी १८ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अस्लम हुसेन शेख व ताहीरुनिशा असलम शेख (रा. मकबरा बिल्डिंग काळा तलवार मकबरा मज्जित जवळ, कल्याण पश्चिम जि. ठाणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख याने कर्जत तालुक्यातील दत्तात्रय संभाजी शेटे, करपडी येथील भाऊसाहेब छगन काळे, राजेंद्र मोहिनीराज बरकडे व एकनाथ सायकर यांचीही याच पद्धतीने फसवणूक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी: एप्रिल २०२० मध्ये निलेश सायकर यांच्याकडून अस्लम शेख याने द्राक्षे खरेदी केले होते. शेख याने सायकर यांना सुरवातीला काही रक्कम दिली.

तर उर्वरित ९ लाख ७२ हजार ५०० रुपयांच्या रकमेचा शेख याने ताहीरुनिशा शेख हिच्या बँक खात्याचा धनादेश दिला. सायकर

यांनी हा धनादेश बँकेत दिला तेव्हा त्या खात्यावर पैसे नसल्याचे समोर आले. त्यानंतर शेख याला वारंवार संपर्क करुनही त्याने सायकर यांचे पैसे दिले नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24