अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे. ज्या ठिकाणी संप मागे घेतला आहे त्या आहाराच्या बस काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत.परंतु अनेक बसवर दगडफेक करण्यात आली आहे.
तर कोपरगाव आगाराच्या बसचे मात्र ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान लालपरी रस्त्यावर धावु लागल्याने प्रवाशांमध्ये समाधान पसरले आहे.
एसटी कर्मचारी आणि शासनाने हा संपाचा तिढा सोडवून सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी हुकमी असलेली सर्व बससेवा सुरळीत कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
परंतु नगरहून शेवगावकडे जाणाऱ्या एसटी बसवर आज सायंकाळी अज्ञात इसमाकडून पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
संबंधित बस पाथर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरील बस ही शेवगाव आगाराची आहे.
तर कोपरगाव आगाराची कोपरगाव- श्रीरामपूर ही एसटी बस राहाता तालुक्यातुन पोलीस बंदोबस्तात श्रीरामपूरच्या दिशेने रवाना करण्यात आली यावेळी या बसचे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले.