अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर टाकळीढोकेश्वर येथील बायपासवर असलेल्या यश अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील डॉ. संदीप देठे
यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरटयांनी दिवसाढवळया १ लाख ७० हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे तसेच ५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली.
सोमवारी दुपारी चार ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी यश अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील कुलूपबंद असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
बेडरूमधील कपाटाची उचकापाचक करून त्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, १६ ग्रॅम वजनाची सोन्याची मन्यांची माळ, आठ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले तसेच पाच हजार रूपयांची रोकड चोरून नेली.
घटनेची माहीती समजल्यानंतर पारनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळास भेट देत कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या. श्वानपथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात येउन चोरट्यांचा शोध घेण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved