भरदिवसा घरात घुसून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील राघोहिवरे येथील मोहन भाऊसाहेब घालमे यांच्या शेतात बाजरीची काढणी सुरू असताना मोटारसायकलीवरून आलेल्या

चोरट्यांनी गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घरातील ७० हजारांचे सोन्याचे दागिने व साठ हजार रोख असा १ लाख ३० हजारांचा ऐवज लांबवला.

पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परमेश्वर जावळे करत आहेत. वाढत्या चोऱ्या हा चिंतेचा विषय बनला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24