बसमधून उतरणाऱ्या महिलेचे केले दागिने लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बसमधून खाली उतरणाऱ्या महिलेच्या पाठीवर असलेल्या बॅगमधून सुमारे ८२ हजारांचे दागिने लंपास केले.

ही घटना शेवगाव बसस्थानकात घडली. याबाबत शिल्पा सुभाष शेळके यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की,

फिर्यादी शिल्पा शेळके या अहमदनगर येथून शेवगाव येथे बसने गेल्या असता त्या बसस्थानकावर उतरल्या यावेळी येथे बसमधून उतरत असताना बसमध्ये लोकांची गर्दी होती.

या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पाठीवरील बॅगमध्ये ठेवलेल्या पर्समधील ८२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

याबाबत शेळके यांच्या फियादीवरून शेवगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोना.दराडे हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24