जमिनीसंदर्भात सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाच्या नवीन बदलाची माहिती जमीन मालकास त्वरित मिळणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे मोजणीच्या नोटीस यांची माहिती मोबाईलवर मिळणार आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांना आता अधिकाधिक ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय घेतला गेला असल्याने याचाच एक भाग म्हणून अधिकार अभिलेख म्हणजे सातबारा उतारा अथवा मिळकत पत्रिकांचे डिजिटायझेशन भूमी अभिलेख विभागाने केले आहे.
फेरफार उताऱ्यावर देखील शंभर टक्के नोंदी या ऑनलाइन घेतल्या जात असल्याचे माहिती मिळाली आहे. त्यापाठोपाठ जमिनींच्या मोजणीची नोटीस अर्जदारांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई मोजणी व्हर्जन २ हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
जमिनीच्या मालकी हक्कासंबंधातील प्रकाराची कारवाई सुरू आहे. याची माहिती घ्यावयाची असेल, तर त्यासाठी नागरिकांना महाभूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जाऊन ती घ्यावी लागते. सतत पोर्टलवर जाण्याची आवश्यकता टाळणे. ही नागरिकांची गरज ओळखून भूमी अभिलेख विभागाने आता “नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल”ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिलेख स्कॅनिंग डाटा संकेतस्थळ (वेबसाईट) वर उपलब्ध करून दिला आहे. जमीन मोजणीसाठी पूर्वी टेबल पद्धतीचा वापर केला जात होता. या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष मोजमाप घेण्यासाठी जास्त वेळ लागत होता. त्यासाठी मनुष्यबळ जास्त लागत होते. भूमी अभिलेख विभागास अत्याधुनिक रोव्हर मशिनरी उपलब्ध झाल्या आहेत.
त्यामुळे कमी मनुष्यबळात अचूक मोजणी अल्पावधीत होत आहे. उपग्रहाच्या माध्यमातून या मशिनरीचे कामकाज चालत आहे. मानवी हस्तक्षेप नसल्याने मोजणीमध्ये गतिमानता आणि अचूकता येत आहे. जिल्हा नियोजन समितीने ही यासाठी विशेष निधी दिलेला आहे.
महत्त्वाच्या वेबसाईट
१) मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्डी)- www.digitalsatbara. mahabhumi.gov.in
२) गाव नकाशे (भू-नकाशा)- www.mahabhunakasha. mahabhumi.gov.in
३) अभिलेख स्कॅनिंग डाटा (दस्तजाऐवज) aapleabhilekh mahabhumi. gov. in