अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा जोरा शोरात प्रचार चालू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्र साठा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे.
खेड बस स्थानकावर दोघांकडून ४ पिस्तुले व ८ काडतुसे असा १ लाख ७४ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे. हि मोठी कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांनी केली आहे.
प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओहोळ(वय २८,रा.वाळद,ता.खेड ),निलेश उर्फ दादा राजेंद्र वांझरे(वय २४,रा.वांझरवाडी ,ता.दौंड)अशी अटक केल्या आरोपींची नावे आहेत.
काल सायंकाळी प्रचार संपला असून उद्या शुक्रवारपासून मतदान सुरु होणार आहे. त्यामुळे निवडणूका असल्यामुळे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्वाना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हेशाखेचे पथक पेट्रोलिंग करत होते. गुन्हे शाखेचे पथक खेड भागात पेट्रोलिंग करत असताना दोघे जण खेड बसस्थानकावर पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांचे सहकारी खेड बस्थानकावर पोहोचले. त्यांनी तेथे संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन तपास केले असता त्यांना ४ पिस्तूल त्यामध्ये २ काडतुसे असे ८ काडतुसे आढळून आले.