अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या ५१ व्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राजीव राजळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना फळांचे वाटप, तसेच अभय आव्हाड सामाजिक प्रातिष्ठानच्या वतीने कोरोना रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले.
पंचायत समिती सभागृहात स्व.राजीव राजळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सभापती गोकूळ दौंड, उपसभापती रवींद्र वायकर, सोमनाथ खेडकर, पं. स. सदस्य विष्णुपंत अकोलकर,
सुनील ओहोळ, सुभाष केकाण, एकनाथ आटकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, बंडू बोरुडे, अजय रक्ताटेे,
नगरसेवक प्रवीण राजगुरू, प्रसाद आव्हाड, नामदेव लबडे, रमेश हंडाळ, अनिल बोरुडे, बादल पलाटे, नितीन गट्टाणी, रामनाथ बंग, भाजप शहराध्यक्ष अजय भंडारी, सरचिटणीस जे. बी. वांढेकर,
युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, वैैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. सुहास उरणकर, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष युसूफ शेख, कोषाध्यक्ष अशोक मंत्री, जगदीश काळे,
अभिजित गुजर, प्रसिध्दीप्रमुख नारायण पालवे आदी उपस्थित होते. तालुक्याच्या ग्रामीण भागातही कासार पिंपळगाव, कोरडगाव, टाकळीमानूर, खरवंडी कासार, माणिकदौंडी, अकोला,
तिसगाव, करंजी, मिरी, सुसरे, माळीबाभुळगाव आदी मोठ्या गावांसह अनेक गावांत रक्तदान शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, वृक्षलागवड, फळेवाटप अशा विविध कार्यक्रमांनी स्व. राजळे यांची जयंती साजरी करण्यात आली.
स्व. राजीव राजळेंची ५ डिसेंबरला जयंती व ७ ऑक्टोबर पुण्यतिथी शहरासह तालुक्यात सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशीही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved