अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र यांनी शेतक-यांसाठी विकसीत केलेल्या ‘प्रवरा कृषी केयर’ या मोबाईल अॅप चे लोकार्पण प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.
माहीती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्मार्ट शेतकरी तयार करण्याच्या उद्देशाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि साई इन्फो सोल्युशनचे संचालक संतोष गोरे यांच्या पुढाकाराने कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल असे अॅप विकसीत करण्यात आले आहे.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणारे कृषी महाविद्यालये, डेअरी सायन्स, बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहभागातून तयार झालेले हे अॅप पीक उत्पादनापासुन ते विक्री पर्यंतच्या सर्व व्यवस्थांना जोडले गेले आहे. या माध्यमातून शेतक-यांना कृषी क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान,
पीक लागवड पध्दत, हवामानाचा अंदाज, बाजारभाव घरबसल्या माहीती करुन घेता येणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास माजी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, चेअरमन नंदु राठी, बाभळेश्वर कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.संभाजी नालकर, सेक्रेटरी डॉ.रेड्डी, डॉ.हरिभाऊ आहेर, भारत घोगरे,
प्रा.डॉ.विजय आहेर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या संदर्भाम माहीती देताना आ.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, काळाची गरज ओळखुन शेतक-यांनी आता बदलल्या प्रवाहानुसार कृषि क्षेत्र विकसीत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून हे प्रवरा कृषी केयर अॅप तयार करण्यात आले.
या माध्यमातून शेतक-यांना हंगामानुसार पीक पध्दतीचे मार्गदर्शन होईलच पण यापेक्षाही लॅब टु लॅन्ड या संकल्पनेतून सल्लाही मिळेल. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने जागतीक बॅंकेच्या सहकार्याने यापुर्वीच देशातील बाजार भाव शेतक-यांना समजावेत म्हणून व्यवस्था निर्माण केली.
या अॅपच्या माध्यमातूनही शेतकरी थेट ग्राहकांना कसा जोडला जाईल हा प्रयत्न केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि क्षेत्राबरोबरच दुग्ध व्यवसायाचे महत्वही ग्रामीण अर्थव्यवस्थेत वाढले आहे. या व्यवसायाच्या बाबतीतही पशुपालकांना मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था या अॅपमध्ये केली गेली असल्याने
दुग्ध व्यवसायीकांच्या दृष्टीनेही या अॅपचे महत्व निश्चितच आधोरेखीत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संतोष गोरे यांनी शेती, दुग्ध व्यवसायाबरोबरच महीला बचत गटांना या अॅपच्या माध्यमातून आपली उत्पादने नोंदवून विक्री वाढी करीता या अॅपची मदत होईल.
राज्यात आणि देशात कृषि क्षेत्राच्या संदर्भात सातत्याने होणारे बदल, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, विविध परिसंवाद तसेच कृषि क्षेत्रासंदर्भात माहीती देणारे सर्वच माध्यमांच्या लिंक या अॅप मध्ये अंतर्भुत करण्यात आल्या असल्याने शेतक-यांना योग्य तो सल्ला आणि योग्य मार्गदर्शन होवून होणारी फसवणूक टाळता येणार असल्याचे सांगितले.