अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- फटाक्यांच्या माध्यमातून आतिषबाज करून सर्व नागरिक आपला आनंद द्विगुणित करत असतात. नगर शहर फटाक्याचे राज्यस्तरीय मार्केट आहे. या ठिकाणाहून पूर्ण जिल्ह्यामध्ये फटाके पुरविले जाते.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. शहरातील अनेक युवक एकत्र येऊन फटाक्यांचे स्टॉल लावत असतात. तसेच पूर्ण सुरक्षिततेची खबरदारीही घेतली जाते. मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पांजरापोळ जागेवर नगर शहर फटाका मार्केट उभारून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचं काम करत आहे.
असे प्रतिपादन आ. संग्राम जगातप यांनी केले. मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पांजरापोळ जागेवर नगर शहर फटाका मार्केटच्या स्टॉलचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनेष साठे, वैभव ढाकणे, कैलास खरपुडे,
रमेश बनकर, अभिजित खरपुडे, अतुल आंबेकर, अभिषेक खंदारे, तुषार डागवाले, आकाश खंदारे, सौरभ आरे, विकास पटवेकर, पांडुरंग गाडळकर, अतुल कावळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कैलास खरपुडे म्हणाले की, नगर शहरातील ग्राहकांना फटाके खरेदी करण्यासाठी जवळची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न केले.
शहरातील युवक एकत्र येऊन व्यवसायाच्या माध्यमातून नगर शहर फटाका मार्केट पांजरापोळ जागेवर सुरू केले आहे. उत्तम दर्जाचे व नामवंत कंपन्यांचे विविध फटाके या ठिकाणी अत्यल्प दरात उपलब्ध आहेत. यासाठी ग्राहकांनी या मार्केटला भेट द्यावी, असे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved