अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- शहरात धुमस्टाईलने चोर्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध ठिकाणी धुमस्टाईलने चोर्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, छाया सुनील जगताप शुक्रवारी दुपारी दत्तनगर येथील दत्त मंदिराच्या समोरील बाजूने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला.
त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने जगताप यांच्या गळ्यातील सोन्याचे अडीच तोळ्याचे मिनी गंठण हिसका देवून तोडून नेले.
दुसऱ्या घटनेत लतिका लक्ष्मण बोराटे त्याच रस्त्याने पायी जात असताना मोटार सायकलवरून आलेल्या एका चोरट्याने बोराटे यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची सोन्याची एक पदरी कंठीमण्यांची माळ हिसका देवून तोडून नेली. या दोन्ही घटनांत चोरट्यांनी 90 हजार रूपयांचा ऐवज लांबवला आहे.
फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरोधात शुक्रवारी रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरसे करत आहेत.