अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-नगर शहरासह जिल्हाभरात चोर्यांचे सत्र सुरुच आहे घरफोड्या, रस्तालूट, मंगळसूत्र चोर्या, लूटमार, असे गुन्हे सध्या जिल्ह्यात सुरू आहेत.
त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात सध्या घरफोड्या वाढल्या आहेत. चोर्या आणि घरफोड्या दिवसाही सुरू आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि वाहनांच्या चोर्या तर प्रयत्न करूनही पोलिसांना थांबविता येत नसल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात सुरु असलेल्या वाढत्या चोरीच्या घटनानांमुळे गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झालेला दिसून येत आहे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेला असून सर्व व्यवहार, उद्योग व्यवसाय सुरु झाले आहेत. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
याचा गैरफायदा चोरटे घेत आहे बाजारात खरेदीसाठी गेलेल्यांचे पैसे चोरणे, दागिने चोरणे, प्रवासात बॅगा चोरणे, वाहने अडवून चोर्या, असे प्रकार सुरू आहेत. पाळत ठेवून चोर्या करणार्या टोळ्याही कार्यरत झाल्या आहेत.
सर्वसामान्याचा विचार करून या चोर्या, घरफोड्या कशा रोखता येतील, चोरांच्या टोळ्यांचा बंदोबस्त कसा करता येईल याकडे जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालून कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.