Ahmednagar News : जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध व्यवसायीकांविरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात ७८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
एकूण १२ लाख ६० हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २६ ते २९ मार्च दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ६६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोतवाली, भिंगार, सुपा, नगर तालुका, एमआयडीसी, श्रीगोंदा, शेवगाव, सोनई, शनिशिंगणापूर, राहुरी, कोपरगाव, राहाता व संगमनेर शहरात अवैध दारू विक्री व्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण ५२ जणांचा समावेश आहे. ९ लाख ७७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ६० आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध जुगार प्रकरणी तोफखाना,
संगमनेर शहर, संगमनेर तालुका, भिंगार कॅम्प, सुपा, शेवगाव व सोनई पोलिस ठाण्यात १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ लाख ८२ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तब्बल १८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली.