अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- पारनेर तालुक्यातील अवैध दारुधंद्यावर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यामध्ये १ लाख ७० हजार ९०० रुपयांचा दारुसाठा जप्त करुन ६ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

दोन दिवसाच्या कालावधीत ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये १ लाख ७० हजार ९०० रु. किं.चा मुद्देमाल त्यामध्ये देशीविदेशी, ताडी, गावठी हातभटटीची दारु जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत ६ आरोपींविरुध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. संतोष मधुकर साळवे (वय ४२ रा.ढवळपुरी) याला अटक करून त्याच्याकडून ४० लिटर ताडीचा ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सीताराम विधाटे (वय २१ रा.वनकुटे) याला अटक करून त्याच्याकडून देशी विदेशी दारुचा ४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त, पंडा रामभाऊ खंडवे (वय ३० रा. पळसी),

दत्तात्रय तिकोले (रा.वनकुटे) या दोघांना अटक करून त्याच्याकडून देशी विदेशी दारु १ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त, नितीन मारुती साळवे (वय ४५ रा. पळसी) याला अटक करून

त्याच्याकडून देशी विदेशी दारु १ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त, संभाजी विठ्ठल गव्हाणे ( रा. म्हसे) याला अटक करून त्याच्याकडून १ लाख ६० हजाराचा गावटी हातभटटीची तयार दारु,

कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.