‘नेते दुसरीकडेच फिरतात, अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत काय?’; ‘ते’ कडाडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असले तरी मंत्री आणि नेते इतर भागात गेले पण नगरला पालकमंत्रीही फिरकले नाहीत.

नगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत काय?’ असा सवाल शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी उपस्थित केला आहे. अतिवृष्टीग्रस्त भागात सध्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांचे दौरे सुरू आहेत. नगर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याकडे लक्ष वेधताना दहातोंडे यांनी म्हटले आहे की,

‘अतिवृष्टीने लाखो शेतकऱ्यांना उद्वस्त केले आहे. आधी दुष्काळाने छळले, यंदा ओल्या दुष्काळाने मारले आहे. असे असताना वेगाने पंचनामे होत नाहीत. नगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का? येथील शेतकऱ्यांचे आश्रु सरकारमधील लोक, पालकमंत्री कधी पुसणार? सर्वच शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे.,

त्यामुळे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी.’ जिल्हा प्रशासन तसेच शासनाने तातडीने झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथ, शेतकरी मराठा महासंघातर्फे आंदोलन करण्यात येईल,’ अशा इशाराही दहतोंडे यांनी दिला आहे.

दरम्यान , जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीतीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कपाशी, सोयाबीन, बाजरी, मूग घास या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जास्तीच्या पाउसाने डाळिंब फळाचेही नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले.

तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24