अहमदनगर बातम्या

बसस्टँडवर सोडतो म्हणत जंगलात नेऊन विनयभंग ! त्या मुलाविरोधात गुन्हा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नाशिक जिल्ह्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दि. २८ फेब्रुवारीला दुपारी हा प्रकार घडला.

या प्रकरणी शुक्रवारी (दि.०१) रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घुलेवाडी येथील एका मुलाविरोधात गुन्हा नोंदवून घेतला.

स्वामी रमेश तामचीकर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीला संगमनेर बसस्थानकात सोडवतो, असे म्हणत त्याने मुलीला दुचाकीवर बसविले.

तिला बसस्थानकात घेऊन न जाता, तळेगाव येथील जंगलात घेऊन गेला. तेथे त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला मारून टाकीन, अशी धमकीही दिली.

घडला प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर ती नाशिक जिल्ह्यातील एका गावातून संगमनेरात आली, त्यानंतर ती मुलीसमवेत पोलिस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (पोक्सो) हा गुन्हा दाखल झाला आहे.

Ahmednagarlive24 Office