‘या’ तालुक्यातील सरपंचपदाची सोडत ; काही खुशी कही गम!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायतीच्या ११४ सरपंचपदाचे आरक्षण सोडत बुधवारी सकाळी तहसील कार्यालय आवारात पार पडली असून, या आरक्षण सोडतीमध्ये काहींचा हिरमोड तर अनेक उमेदवारांची लॉटरी लागली आहे.

प्रांताधिकारी सुधाकर भोसले तसेच तहसिलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थिती बुधवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात काढण्यात आले असून

अनुसूचित जाती प्रवर्गातील खुल्या व महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी ३, अनुसचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी ३ तर खुल्या प्रवर्गासाठी ३,

नागरीकांच्या मागास प्रवर्गातीलएकूण ३१ जागांपैकी १५ खुल्या तर १६ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खुल्या प्रवर्गात ७१ जागा असून त्यापैकी ३६ महिलांसाठी तर ३५ जागा खुल्या आहेत.

सरपंच आ- रक्षण सोडतीसाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी पारनेरच्या तहसील कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24