अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- वाळुंज येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करा, अशी मागणी करण्यासाठी सोमवारी पोलिस ठाण्यात गेलेल्या मुलीच्या वडिलांना तुरुंगात टाका,
असे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी फर्मावल्याने बाचाबाची झाली. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार थांबवा आणि आरोपीला अटक करा; अन्यथा २ सप्टेंबरला मोर्चा काढून आमची ताकद दाखवू,
असा इशारा संतप्त नातेवाईक व भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला. तक्रार देऊन पंचवीस दिवस झाले असून आरोपी राजरोस पाथर्डी शहरात फिरतो,
तरीही पोलिस त्याला अटक करत नाहीत. सोमवारी मुलीचे नातेवाईक व भाजपचे पदाधिकारी पोलिस निरीक्षक रत्नपारखी यांच्याकडे गेले.
त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मुलीच्या वडिलांनाच जेलमध्ये ठेवा, असे पोलिस निरीक्षक रत्नपारखी म्हणाल्याने उपस्थित संतापले. आरोपीने जामिनासाठी नगरच्या न्यायालयात अर्ज केला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved