अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील सध्या ७६७ ग्रामपंचायती निवडणूक जाहीर झालेली असताना ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्यावर भर दिला जात आहे.
या विषयावर स्थानिक आमदार ग्रामपंचायतींना १०लाख ते २५ लाखांचे आमिष दाखवून सदर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसे जाहीर आव्हान त्यांनी वर्तमानपत्राद्वारे सुद्धा केले आहे.
अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग तर आहेच तसेच लोकशाहीचा खून आहे. त्यामुळे असे आमिष दाखवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
पैशाचे प्रलोभन दाखवून निवडणुका बिनविरोध करणे हे घटनाबाह्य असून, धनदांडग्या व प्रस्थापित नेत्यांच्या फायद्याचे आह.े ग्रामपंचायतीची निवडणूक ही मोठ्या संघर्षाची असते.
गावागावात मतभेत आणि गावाचा खुंटलेला विकास हे स्थानिक आमदार माहित असून देखील समाजातील वंचित घटकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. कारण वंचित समूह हा पैशाची राजकारण करू शकत नाही हे माहीत असल्यामुळे काही आमदार पैशाच्या व सत्तेच्या जोरावर वंचितांची मुस्कट दाबी करत आहेत,
ज्यांना ग्रामपंचायत सदस्य व्हायचे असेल तर ५० हजार रुपये व सरपंच व्हायचे असेल त्यांनी १ लाख रुपये निधी गावासाठी द्यावयाचा आहे. यासाठी इच्छुकांची नावे घेऊन सोडत काढली जाईल अशा प्रकारच्या घटनाबाह्य ऑफर आमदाराकडून दिल्या जातात.
त्यामुळे वंचित दुर्लक्षित घटकांना आपला उमेदवार सदस्य आणि आपल्या मतदानातून निवडून येण्याची संधी सर्वसामान्य मतदारांना मिळणार नाही अशा पद्धतीने निवडणुका बिनविरोध झाल्या तर सदस्य निवडीचा अधिकार मतदारांना राहणार नाही.
त्यामुळे सर्वसामान्य वंचित दुर्लक्षित भटक्या समाजाच्या मतदारांना विश्वासात घेऊन ग्रामसभेत ठराव करीत राज्यघटनेप्रमाणे निवडणुका होऊ द्याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा व लाख रुपये मिळवा” अशा प्रकारचे आश्वासने /आव्हाने करणारे लोकप्रतिनिधी आचारसंहितेचा भंग करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.