अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून बिबट्या गायब झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व इतर नागरिक काहीसे भयमुक्त झाले होते. परंतु परत एकदा बिबट्याने एका शेतकऱ्याची शेळी ठार मारून खाल्याने ग्रामीण भागात अद्यापही बिबट्याचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील बनवस्ती पासुन 200 मिटर अंतरावर लक्ष्मण बन हे शेतात शेळ्या चारत होते.याच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्याने एका जाळीतुन बन यांच्या शेळीवर झेप घेतली व जागेवर मारून जवळच असलेल्या डोंगराच्या झाडीमध्ये ओढत नेली.
यावेळी लक्ष्मण बन यांनी आरडाओरड केला तेव्हा शेजारच्या शेतात काम करत असलेले लहु मेजर, अमोल नरोटे, अमोल शेंडगे, देवा शेंडगे, बाजीराव डोईफोडे, नामदेव डोईफोडे, भाऊसाहेब बन, अनिल डोईफोडे, गणेश डोईफोडे यांनी बिबट्याचा पाठलाग करून शेळी जाळीतुन उचलुन आणली.
ही माहीती पं.स सदस्य सुनिल पाटील ओहोळ, सरपंच कल्पजित डोईफोडे, मुकंद गर्जे , सुनिल नरोटे यांना समजताच यांनी वन विभागाचे कर्मचाऱ्यांना पाठवले व पंचनामा केला.