अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवारी सकाळी ४ वर्षांचा नर जातीचा मृत बिबट्या आढळला. वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला आश्वी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन शवविच्छेदन केले.
विजेचा शॉक बसून बिबट्या मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शेडगाव येथील डाळिंबी मळ्यात संतोष आमले यांच्या उसाच्या शेतात दोन दिवसांपूर्वी विजेची तार तुटून पडली.
आमले यांनी महावितरणकडे याबाबत तक्रार केली. गुरुवारी तारेची जोडणी करण्यासाठी कर्मचारी आले असता तारेला बिबट्या चिकटल्याचे आढळले.
ही माहिती माजी उपसरपंच दिलीप नागरे यांनी वनविभागाला दिली. वनक्षेत्रपाल एच. एस. बारेकर, वनरक्षक एस. पी. सातपुते, एस. बी. सोनवणे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com