अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बिबट्याने काळवीटाची शिकार केली होती. सोमवारी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी मनेष जाधव यांनी केले आहे. चापेवाडी शिवारात दादासाहेब काळे यांच्या घरातील पडवीत असलेल्या कुत्र्याची शिकार बिबट्याने केली.
या वस्तीलगत मोठे वनक्षेत्र आहे. या परिसरात हरीण, काळवीट व इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे. मागील आठवड्यात काळे यांची शेळी फस्त करण्यात आली होती. लांडग्यांच्या हल्ल्यात शेळी मेली असे वाटले होते, परंतु सोमवारच्या घटनेमुळे या परिसरात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले