अहमदनगर बातम्या

चक्क पेट्रोल पंपावर पोहोचला बिबट्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  गल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या.

यातच बिबट्याने सोमवारी चासनळी परिसरात पुन्हा एकदा दर्शन दिल्याची माहिती पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक प्रवीण पगारे यांनी दिली त्यामुळे परिसरातील नागरिकात व शेतकऱ्यात दहशत पसरली.

या भागात पिंजरे लावावेत, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील चासनळी येथील सरपंच निळकंठ चांदगुडे यांच्या पेट्रोल पंपावर सोमवारी (२७) रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली.

बिबट्याने मोठ्या ऐटीत रॅम्पवॉक करीत १५ ते २० मिनिटे पंपावरील सर्व परिसरात फेरफटका मारला. यावेळी पेट्रोल पंपावर रात्रपाळीसाठी असलेले कर्मचारी विशाल शिंदे होते.

त्यांनी समोर बिबट्या पाहताच जीव मुठीत धरून मोठ्या धाडसाने आपल्या मोबाइलमध्ये बिबट्याचे व्हिडिओ शूटिंग केलेल तिकडे पंपावर असलेल्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानेही बिबट्याचे मुक्त संचाराचे चित्रण केले. बिबटयाचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

याबाबत माहिती मिळताच मंगळवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंपास भेट देऊनन माहिती घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनाबद्दल माहिती सांगितली.

खबरदारीचा उपाय म्हणून गुराख्यांनी एकत्र जनावरे संभाळावीत, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे टाळावे, जनावरे शेळ्या बंदिस्त ठेवण्याचे आवाहन केले.

Ahmednagarlive24 Office