अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- बेलवंडी परिसरात सतत बिबट्या दिसण्याच्या तक्रारी यापूर्वी नागरिकांनी वनविभागास केल्या होत्या परंतु पिंजरा लावल्यानंतर अनेक वेळा वनविभागास अपयश आले होते.
तसेच ठोस पुरावे व ठसे बाबत संभ्रम कायम राहिल्याने वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले होते.दिनांक २३ मे रोजी माजी सरपंच दिलीप रासकर हे शेतात गेले असता बेलवंडी स्टेशन रेल्वे पुलाच्या परिसरात राजू पोपट काळाणे यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचे संध्याकाळी ६.४५ मिनिटांनी दर्शन दिले .
यावेळी रासकर यांनी बिबट्याचा व्हिडीओ घेत संबंधित परिसरातील नागरिकांना तसेच वनविभास कळवले .लॉकडाउन च्या काळात सर्व लोक घरीच असतात ,तसेच रात्री ची लाईट वेळ असल्यावर शेतात पाणी देण्यास जात असतात त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .
या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com