अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा व गोदावरी नदी परिसरासह तालुक्यातील अनेक भागांत बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. यामुळे नागरिकांत कमालीचे भीतीचे वातावरण पसरल्याने वन विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात बिबट्याने दहशत घातली आहे.
अनेकांवर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ठार केले. मेंढ्या, कालवडी आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्याचे सर्वेक्षण करून ठिकठिकाणी पिंजरे लावावे. तसेच कायम स्वरुपासाठी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच निमगाव खैरी शिवारात पिंजर्यात अडलेला बिबट्या गोदावरी नदी परिसरातील नाऊर शिवारात सोडल्याने ग्रामस्थांनी संताप केला आहे.
त्यामुळे वन विभागाने बिबट्यापासून बचावासाठी आता समाज माध्यमांद्वारे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध ग्रुपमधून व्हिडीओद्वारे शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved